अ. कर्नाटक भोवी समाज कल्याण संघाची मागणी
बेळगाव : अनुसूचित जाती यादीमध्ये भोवी बरोबरच वड्डर उपजातीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे भोवी समाजातील पालखी वाहून नेणाऱ्या व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे भोवी जातीतील नागरिकांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देताना प्रमाणपत्रावर केवळ भोवी असाच उल्लेख करावा व वड्डर हे नाव वगळावे, या मागणीसाठी सोमवारी सुवर्ण विधानसौधसमोरील कोंडुसकोप येथे अखिल कर्नाटक भोवी समाज कल्याण संघातर्फे आंदोलन करण्यात आले. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील विजापूर, धारवाड, बागलकोट या जिल्ह्यांमध्ये भोवी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे समाजाचा एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घ्यावा. तसेच सरकारने भोवी समाजासाठी महामंडळ स्थापन केले आहे. परंतु, आता या महामंडळाचे भोवी-वड्डर असे नामकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारने हे नामकरण तात्काळ थांबवले आहे. त्याचप्रमाणे भोवी महामंडळ असे नाव ठेवावे, भोवी समाजाच्या नावावर अनुसूचित जातींच्या सुविधा काही जण घेत आहेत. त्यामुळे भोवी-वड्डर ऐवजी भोवी अशाच नावाचे प्रमाणपत्र देण्याची मागणी आंदोलकांनी केली.









