Bhoomipujan is done! Now when is the time for the construction of the bank of the lake?
सावंतवाडीतील कोसळलेल्या मोती तलावाच्या कटड्याचे काम भूमिपूजन होऊन पंधरा दिवस उलटले तरी सुरू झालेले नाही. कठड्याच्या कामासाठी 50- 50 लाखाच्या दोन निविदा निघाल्या होत्या काम लवकरच सुरू होईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली होती. त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भूमिपूजन केले मात्र 15 दिवस उलटले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. काम सुरू करण्यासाठी तलावाचे पाणी आटवण्यात आले. त्यामुळे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आणि दुर्गंधी पसरली मोती तलावातील गाळ काढताना गतवर्षी तलावाचे पठाडे कोसळले होते. त्यामुळे पदपाथ धोकादायक बनला होता. तसेच सावंतवाडी बांदा मार्गाही वाहतुकीसाठी खडतर बनला आता सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ काम हाती घेणे आवश्यक आहे अन्यथा पावसापूर्वी काम हाती घेतल्यास कठड्याच्या कामाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









