बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर मारुती मोरे यांचा स्तुत्य उपक्रम : स्वयंभू मारुती देवस्थानची शोभा वाढणार
वार्ताहर /कणकुंबी
हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू माऊती मलप्रभा तीर्थक्षेत्रावरील देवस्थानच्या प्रवेशद्वारावर स्वखर्चाने कमान उभारून देण्याचे आश्वासन मोदेकोप येथील बांधकाम व्यावसायिक माऊती मोरे यांनी दिले होते. त्यानुसार बुधवार 27 रोजी सदर कमानीचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. माऊती मोरे हे गेल्या अनेक वर्षापासून रत्नागिरी जिह्यातील चिपळूण तालुक्मयामध्ये बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू माऊती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थानच्या प्रवेशद्वारावर स्वखर्चाने त्यांनी आपल्या आईवडील वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई मोरे व वै. ह.भ.प. तुळजाप्पा मोरे यांच्या स्मरणार्थ कमान उभारण्याचा संकल्प केला होता. यासाठी त्यांनी देवस्थान कमिटीकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार 23 सप्टेंबर रोजी झालेल्या देवस्थानच्या बैठकीत परवानगी देण्यात आली.
दि. 27 सप्टेंबर रोजी त्यांचे ज्येष्ठ बंधू हभप गणपती व हभप रेणुका मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी हब्बनहट्टी येथील ज्येष्ठ नागरिक शंकर आप्पाजी घाडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसार्लेकर होते. प्रारंभी कमिटीचे सेव्रेटरी संतोष कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी माजी उपाध्यक्ष चिदंबर गावकर, ता. पं. माजी सदस्य पुंडलिक वा. पाटील, पुंडलिक लक्ष्मण पाटील, कल्लाप्पा गावडे, नामदेव गुरव, नामदेव पाटील आदी मान्यवरांनी मारुती मोरे यांच्या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले. व्यासपिठावर कमिटीचे उपाध्यक्ष नानू गावडे, कल्लाप्पा मोरे, कृष्णा कुलमुटकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सखाराम धुरी यांनी केले.









