सावंतवाडी / प्रतिनिधी
सावंतवाडी शहरात 16 व्या व 17 व्या शतकात बांधण्यात आलेले सावंतवाडी चर्च ख्रिस्ती बांधवांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. आजचा ४ मे दिवस चर्चच्या इतिहासात एक आनंदाचा सोहळा असाच आहे. सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकोप्याने हे चर्च उभारावे आणि निश्चितपणे हे उभारण्यात येणारे देवाचे चर्च ख्रिस्ती बांधवांसाठी एकतेची खूण म्हणून गणले जाईल. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आध्यात्मिक धार्मिक विकास क्षेत्रात संस्कृतीचे आणि शांतीचे चिन्ह म्हणून शिरपेचात मानाचा तुरा रोवेल. अशा शब्दात गोवा सरधर्म प्रांताचे महागुरू स्वामी फिलिप नेरी कार्डिनल फेराव यांनी नव्याने उभारण्यात येत असलेल्या चर्चा भूमिपूजन सोहळ्या दिनी मत व्यक्त केले. सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूल जवळ भव्य दिव्य असे चर्च उभारण्यात येत आहे या नव्या चर्चा कामाचे भूमिपूजन शुभारंभ आज चार मे रोजी चर्चा वार्षिक सण या दिनी हा सोहळा करण्यात आला.









