सातारा प्रतिनिधी
घरावर पितृदोष असून कोणीतरी करणी- भानामती केली आहे. हा दोष काढण्याचे आश्वासन देऊन साडेतीन हजाराला ठगविणाऱ्या अंभेरी येथील भोंदू बाबाला रहिमतपूर पोलिसांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी जंगू मुलांनी अंभेरी येथील भोंदू बाबावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीची फसवणूक झाल्याचे समजताच त्याने रहिमतपूर पोलीस आणि अनिसचे कार्यकर्त्यांनी सापळा रचून भोंदू बाबा जंगु मुलाणी याला रहिमतपूर येथील रहिमतपूर- वाठार रस्ता लगत असलेल्या एका गॅरेजमध्ये रंगेहाथ पकडले. रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.