मागणी सरकारची धग वाढविणार : आमदार विरेश बोरकर, काँग्रेसचे अमित पाटकर आक्रमक,पेडणे,वास्को,सत्तरी, पणजी व खांडेपार आंदोलनकर्त्यांचा वाढता पाठिंबा,स्व. मनोहर पर्रीकरच्या सन 2010 आंदोलनाची धग वाढविणार
वार्ताहर /माशेल
भोम प्रश्नी देवदेवतांना आणि गावातील संरक्षक शक्तीपुढे प्रार्थना करूनही सरकारला जाग येत नसल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करून सरकारला लोकशाहीची ताकद जनआंदोलनातून दाखवून देऊ! गाव राखण्यासाठी गावातील लोकांनी पुढाकार घेऊन मेळावली सत्तरी सारखे आंदोलन यशस्वी केले. हल्ली पेडणेच्या जमीन रूपांतरणप्रकरणी ग्रामस्थापुढे सरकार नमले. त्याच धर्तीवर सरकराला अद्दल घडविण्यासाठी ग्रामस्थांनी यशस्वी लढा उभारून विरोधाची धग कायम राखावी असे एकमत सभेत झाले. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रस्ताविक रूंदीकरणापासून भोम गावच्या रक्षणहेतून ग्रामस्थांच्या पाठिंब्याला राज्यभरातून जमा झालेल्या समविचारी लोकांना एकत्रित जाहीर सभेतून सरकारला निर्वाणीचा ईशारा दिला.
भोम येथील रस्ता रूंदीकरणच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आमी भोमकार-‘भोमकराक जाय बायपास’ या बॅनरखाली काल रविवारी सायंकाळी नागझरवाडा-भोम येथे ही जाहीर सभा पार पडली. भोम ग्रामस्थांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पेडणे, वास्को, मेळावली, सत्तरी, खांडेपार भागातील समविचारी मोठ्या संख्येन एकत्रित झाले होते. त्dयाच्यासह रेव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर, कॉग्राचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, शंकर पोळजी, अॅड सुषमा गावडे, सुनिल देसाई, भोमचे माजी सरपंच सुनिल भोमकर, राजेंद्र कोरगावकर, विश्वेश नाईक, निलेश गावडे, कॅ. बॅरेटो, राजेंद्र घाटे, शैलेद्र वेलिंगकर, शैला नाईक, सुनिल बोरकर, पोपट भोमकर, रोहिदास नाईक, डॉ. सत्यवान गावकर, जरीना डिव्रुज, अॅथनी डिसील्वा, प्रेमानंद गावडे, ट्रोजन डिमेलो, उपस्थित होते.
बायपासची मागणी मान्य करा, घरांना सुरक्षा पुरवा
गावकऱ्यांचा सरकारवरचा विश्वास पुर्णपणे उढालेला आहे. रस्ता रूंदीकरण क्षेत्रात येणाऱ्या घरांचे संरक्षण करण्यासाठी बायपासची मागणी जोर धरत आहे. भोम ग्रामस्थांची दिशाभूल भाजपा सरकार करीत आहे असा सुर सर्व वक्त्यांनी आळवला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक आमदारावरही जोरदार टिका केली. सध्या अस्तित्वात असलेल्या या रस्त्याच्या चौपदारीकरणामुळे दोन भागात विभाजन होईल. तर रस्त्यालगतची अनेक घरे, दुकाने, आणि दोन मंदिरांना कायमचा धोका संभवणार अशी येथील ग्रामस्थांना भिती आहे, अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुरक्षितरित्या गावच्या बाहेरील बाजूने बायपास करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
स्थानिक आमदाराची पाठ, तरीही भोमकार लढा सुरूच ठेवणार
यावेळी बोलताना भोमचे माजी सरपंच सुनिल भोमकर म्हणाले मागील वर्षभरापासून बायपासची मागणी भोम ग्रामस्थ करीत आहे. यावर मुख्यमंत्री तसेच स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी मौन बाळगलेले आहे. ग्रामस्थांच्या बाजूने स्थानिक आमदार नसल्याचा आरोप भोमकर यांनी केला. बायपासची मागणीचा विषय महामार्गाची आखणी केल्यापासून म्हणजेच सन 2010 पासूनचा आहे. भोम गाव वाचविण्याच्या हाकेला राज्यभरातील समविचारी नेत्यांनी दाखविलेला पाठिंबा भोम ग्रामस्थांना पेडणेकराप्रमाणे उर्जा वाढविणार, जोपर्यत बायपासची मागणी पुर्ण होत नाही तोपर्यत लढा सुरूच ठेवणार असे भोमकर म्हणाले.
केंद्र सरकारच्या आदेशावर ढोलणारे राज्यातील भाजपा सरकार
भोमच्या विषयावर सातत्याने बैठका व जाहीर सभांचे सत्र सुरूच आहे. आजपर्यत हा प्रश्न का सुटत नाही याचा सारासार विचार दिवसेंदिवस उद्धटपणे वागणाऱ्या बांधकाम मंत्री निलेश काब्रांल यांनी जरूर करावा. ग्रामस्थांचे प्रश्न दुर्लक्षित करण्याचे धोरण बांधकाम मंत्र्यांनी आरंभलेले आहे. केद्र सरकारच्या हाकेवर मान ढोलविणारे राज्यातील निर्लज्ज भाजपा सरकार प्रत्येकवेळी गावातील लोकांवर रस्त्यावर आणण्याची वेळ आणीत आहे. सामान्य गोयकाराच्या अश्रूचे कोणतेचे सोयरसुतक भाजपा सरकराला राहिलेले नसल्याचा आरोप विरेश बोरकर यांनी केला.
काब्राल यांनी एसी कॅबिनमधून बाहेर पडून ग्रामस्थांचे प्रश्न सोडवावे
भोम बायपास रस्त्यासाठी सन 2010 पासून सुरू झालेले आंदोलनाचे स्फूरण खुद्द स्व. मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. त्यावेळच्या कॉग्रेस सरकराने त्dयावेळी कमिटी स्थापन करून बायपासची मागणी ‘रिजनल प्लान’ मध्ये सामावून पुर्ण केली. मात्र आज त्याच आंदोलनकत्dर्या भाजपा सरकारने बायपासप्रश्नी चुप्पी साधलेली आहे. त्यामुळे परत एकदा आंदोलनाला दिशा देत धग वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट कायम राखावी. बांधकाम मंत्री निलेश काब्रांल एसी कॅबिनमध्ये बसून भोम प्रश्न सोडविणे अशक्य असून त्यांनी भोम ग्रामस्थांना विश्वासात घेत त्याना भोम येथे जनसुनावणी घ्यावी असे आव्हान अमित पाटकर यांनी बांधकाम मंत्री काब्राल यांना दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय नाईक यांनी केले. सभेला सुमारे पाचशेहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.









