प्रतिनिधी /पणजी
भोम खोर्ली भागातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केवळ बिल्डर लॉबीच्या भल्यासाठी आहे. स्थानीकांना बेघर करून सरकार बिल्डर लॉबीचे चोचले पुरवत असल्याचा आरोप भोम येथील संजय नाईक यांनी केला आहे. स्थानिकांचा वरेध असतानाही रस्ता ऊंदीकरणासाठी सरकारने पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीरपणे जमीन संपादनाचे काम सुऊ केले आहे. असेही संजय नाईक यांनी सांगितले
काल मंगळवारी आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परीषदेत संजय नाईक बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत खोर्ली भोम येथील आनंद नाईक यांच्यासह सुमारे 50 नागरीक उपस्थित होते. खोर्ली भोम भागातून जाणारा रस्ता ऊंदीकरणाच्या नावाने सरकार काय करू पहात आहे त्याबाबत तेथील लोकांना कोणतीच कल्पना देण्यात आली नाही. रस्ताऊंद केल्या मुळे लोकांची पोतुर्गीज कालीन घरे, छोटेछोटे गाडे जमीनदोस्त होतील इतकेच नव्हे तर हाच रस्ता भोम येथील मंदीराला लागून जाणार असल्याने मंदीराची शोभा नष्ट होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
2002 साली पर्रीकर सरकारच्या काळात बायपास रस्ता काढण्यात आला होता. या रस्त्याची नोंद प्रादेशीक आराखड्यावरही आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणस लोकांचा विरोध नाही. मात्र गावातून गेलेला रस्ता गाव नष्ट करून ऊंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला लोकांचा विरोध असल्याचे संजय नाईक म्हणाले. केवळ बिल्डर लॉबीला फायदा मिळावा म्हणून सरकार लोकांना बेघर करून रस्ताऊंदीकरणाचा खटाटोक करीत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वे क्रमांक 36/9 ही सुमारे एक लाख चौरस मिटीर जमीन गेल्या कित्येक वर्षापासून पडीक स्थितीत होती. ती जमीन आता परप्रांतीय बिल्डर्सना विकण्यात आली असून त्या जमीनीपर्यंत प्लॉट करण्यात आले आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता ऊंदीकरणाच्या नावाखाली सर्वीस रोड करून त्या प्लॉटपर्यंत रस्ता करून देण्याचा हा कट आहे. त्याला स्थानिकांनी विरोध केले आहे असेही ते म्हणाले.
भोम खोर्ली भागातून जाणारा राष्ट्रीय महार्ग ऊंदीकरणास स्थानिकांचा विरोध असतानाही सरकार बेकायदेशीरपणे जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप भोम येथील आनंद नाईक यांनी केला आहे. जमीन मापण्यासाठई आलेल्या लोकांकडे कायदेशीर कागदपत्रे आहेत काय असे विचारले असता त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांवर दबाव आणून आणि पोलिसांची भीती दाखवून रस्ताऊंदीकरणासाठी बळजबरीने नीस घालण्याचे काम सुऊ केले आहे. असेही ते म्हणाले हा लढा गेल्या कित्यक वर्षापासून सुऊ आहे. सरकारने लोकाना समजून घेऊन त्यांच्या समस्या दुर करून नंतर रस्त्याचा विचार करावा अन्यथा भोम खोर्ली वासीय रस्त्यावर उतरतील कोणत्याही संकटाला तोंड देण्यास ते समर्थ आहेत असा इशाराही आनंद नाईक यांनी दिला आहे.









