कोल्हापूर
शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्षेत्रातील मानधनधारक कुस्ती स्पर्धेला रविवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेत विविध 12 वजनी गटात 80 मल्लांनी सहभाग घेतला आहे.पहिल्या फेरीत अर्णव डकरे राशिवडे, चिन्मय लांडगे,ओंकार पाटील यांनी चटकदार विजय मिळविले .
कारखान्याचे संचालक धोंडीराम पाटील आणि विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या हस्ते वजन काटा पूजन करण्यात आले .दुपारच्या सत्रात कुस्ती आखाडा पूजन जेष्ठ प्रशिक्षक संभाजीराव वरुटे , स्वयंभु दुध संस्थेचे अध्यक्ष संजय डोंगळे व निवृत्ती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी झालेल्या कुस्तीत चिन्मय लांडगे वाशी,आयुष कदम ठिकपुर्ली,अभय पाटील व सोहम पाटील,साईराज जाधव सर्व हळदी,सोहम चौगले आवळी, देवराज पाटील कुर्डू,सुयश तापेकर व अर्णव डकरे राशिवडे, ओंकार पाटील सडोली यांनी विजय मिळविले .
समालोचन वस्ताद कृष्णात चौगले राशिवडे यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक धैर्यशिल पाटील कौलवकर, शिवाजीराव पाटील,पांडूरंग कावणेकर,सचिव उदय मोरे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील,दत्तात्रय ऱ्हायकर, धनाजी पोकर्णेकर, प्रकाश टिपुगडे ,शिवाजी नाईक ,सागर गायकवाड ,बाळू चरापले ,शंकर मेडसिंगे आदीसह मान्यवर उपस्थित होते .पंच म्हणून संभाजी वरुटे,संभाजी पाटील, प्रकाश खोत,भरत कळंत्रे,सागर चौगले,राजाराम चौगले, आनंदा खराडे,विलास पाटील,बाळासो मेटकर,तानाजी चौगले यांनी काम पाहिले
Previous Articleचिखली कोमुनिदादवर पुन्हा मंत्री गुदिन्हो समर्थकांचा विजय
Next Article ‘सेरेंडिपिटी’ महोत्सवात हिंदू संस्कृतीला डावलले








