संख प्रतिनिधी
भिवर्गी (ता. जत) येथे विविहतेने दोन मुलासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. मयत राजाक्का धर्मराय बिरादार (वय 28), मुलगा विष्णू धर्मराय बिराजदार (वय 5), माधुरी धर्मराय बिराजदार (वय 2) असे नांव आहे. ही घटना शनिवारी दुपारी 3 वाजता पांडोझरी ओढ्यावरील विहिरीत घडली. रात्री 8 वाजता माहिती समजली. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.
जत पूर्वभागातील भिवर्गी येथील बिळ्यानसिध्द मंदिराच्या पाठीमागे धर्मराय साताप्पा बिरादार हे आई वडील, पत्नी, मुलासमवेत राहतो. गावात धर्मराय बिराजदार यांचे दूध संकलन केंद्र आहे. घरातून शनिवारी दुपारी ती पाणी आणण्यासाठी घागर घेऊन गेली. मुलगा विष्णू, मुलगी माधुरी यांना तिच्या सोबत होते. घरात मुले नसल्याने शोधशोध घेतला. शेजारी, नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु ती सापडली नाही. ग्रामस्थांना ओढ्याजवळील सिध्दू करे यांच्या विहिरीशेजारी घागर, चप्पल आढळून आली. ग्रामस्थांना आत्महत्या केल्याचा संशय आला. घटनेची माहिती पोलीस पाटील श्रीशैल चौगुले यांनी उमदी पोलीस ठाण्यात दिली.
जनरेटर लावून पाण्याचा उपसा केला. परंतु ओढ्याला पाणी असल्याने पाणी निघाले नाही. मृतदेह शोधण्यास अडथळा येत होता. शेवटी सांगोला येथील रेसक्यू टिमला पाचारण करण्यात आले. रेसक्यू टिमने रविवारी दुपारी एक वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व जत येथील ग्रामीण ऊग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.
दरम्यान, राजाक्का बिराजदार यांचे माहेर जत तालुक्यातील माणिकनाळ आहे. आठ वर्षांपूर्वी भिवर्गी येथील धर्मराय बिराजदार यांच्याशी विवाह झाला. पतीचे गावातच दूध संकलनाचे व्यवसाय तर पत्नी शेतमजूर करून उदरनिर्वाह करत होते. त्याना दोन अपत्यही झाले होते. मोठा मुलगा विष्णू पाच वर्षाचा तर मुलगी माधुरी चार वर्षाची होते. संसार सुरळीत चालला होता. घरात किरकोळ भांडण होत असल्याचे घटनास्थळी चर्चिले जात होते. आपल्या निरागस दोन मुलांसह घेऊन विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याने भिवर्गी व माणिकनाळ गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे.