मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी ( Bhima- Koregoan) मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai Highcourt ) आनंद तेलतुंबडे ( Anand Teltumbade ) यांना 1 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाच्या या जामिन मंजूरीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विनंतीवरून स्थगिती दिली आहे. राष्ट्रिय तपास यंत्रणा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या तयारीत आहे.
आनंद तेलतुंबडेने यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाला न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि एम.एन. जाधव यांच्या खंडपीठाने मंजुरी दिली आहे. एप्रिल 2020 पासून भिमा कोरेगाव प्रकारणात अटकेत असलेले तेलतुंबडे यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. आपल्या याचिकेत, आनंद तेलतुंबडे यांनी दावा केला होता की, 31 डिसेंबर 2017, पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात आपण कधीही उपस्थित नव्हतो किंवा कोणतेही प्रक्षोभक भाषण केले नाही. यासंबंधित वृत्त पीटीआयने दिले आहे.
भिमा- कोरेगाव प्रकरणातील कवी वरावरा राव ( Varvara Rao ) आणि वकील सुधा भारद्वाज ( Sudha Bhardwaj ) यांच्यानंतर जामीन मंजूर झालेले तेलतुंबडे हे तिसरे आरोपी आहे. कवी वरवरा राव या वैद्यकिय जमिनावर तर वकिल सुधा भारद्वाज नियमित जामिनावर बाहेर आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








