► प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी दक्षिण मतदारसंघाचे म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, उत्तर मतदारसंघाचे उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना आशीर्वाद दिला. सर्व संघटना तुमच्या पाठीशी असून तुमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून नवरात्रोत्सवामध्ये दुर्गामाता दौड काढण्यात येते. यामध्ये हजारोंच्या संख्येने तरुणांचा सहभाग असतो. ही दौड यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे हे नेहमीच कार्यरत असतात. आता भिडे गुरुजी यांनी या तिन्ही उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. यावेळी कॅप्टन नितीन धोंड यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









