एसआर कांती संघ उपविजेता, 6 खेळाडूंना युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताब
बेळगाव : कागवाड येथील शिवानंद पदवीधर महाविद्यालय, कागवाड आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ आयोजित खो-खो व निवड चाचणी स्पर्धेत अंतिम सामन्यात बेळगावच्या डीएमएस मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय संघाने एसआर कांती महाविद्यालय मुधोळचा 17-2 अशा गड्यांनी पराभव करुन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सहा खेळाडूंना युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताबाने गौरविण्यात आले. आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी हे खेळाडू बेंगळूरला रवाना होणार आहेत.
कागवाड येथे आयोजित या स्पर्धेत भाऊराव काकतकर महाविद्यालय संघाने उपांत्य फेरीत सरकारी महाविद्यालय गोकाख संघाचा 10-2 अशा गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भाऊराव काकतकर महाविद्यालय संघाने एसआर कांती महाविद्यालय मुधोळ संघाचा 17-2 अशा 15 गड्यांनी मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या संघात संध्या चौगुले, अंकिता पाटील, श्रेया मायानाचे, ऋतुजा पाटील, वैष्णवी कुंभार, निशा सुळेभावीकर या खेळाडूंना युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताबाने गौरविण्यात आले. वरील सर्व ब्ल्यू खेळाडू बेंगळूर येथे अलायन्स विद्यापीठ येथे होणाऱ्या साऊथ झोन आंतर विद्यापीठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाचा संघ रवाना होणार आहे. वरील विजेत्या संघाचे भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, प्रा. ए. एस. पाटील, क्रीडा प्राध्यापक सुरज पाटील यांनी त्यांचा गौरव करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.









