प्रतिनिधी / बेळगाव
शहर परिसरात बुधवारी भाऊबीज उत्साहात साजरी झाली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही घरोघरी बहिणींनी भावांना ओवाळून हा सण साजरा केला. यावेळी बहिणींनी आपल्या भावाचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. यावेळी बहिणींना त्यांना गोडधोड खाऊ घातले. शिवाय भावांनी बहिणींच्या प्रेमापोटी भेटवस्तू
दिली.
सासरी गेलेल्या बहिणीला माहेरी दिवाळी सणाला आणणाऱया भावंडांचीही बुधवारी लगबग पाहायला मिळाली. काही भावांनी बहिणींकडे जाऊन भाऊबीज साजरी केली. लाडक्मया भावाला ओवाळल्यानंतर काही भावांनी बहिणींना मोबाईल, दागिने, कपडे आणि इतर वस्तू भेटीदाखल दिल्या. त्यामुळे भाऊबिजेच्या निमित्ताने कौटुंबिक वातावरण चैतन्यमय बनले होते.









