वार्ताहर /लाटंबार्से
भटवाडी – उसप, डिचोली येथील श्री लक्ष्मी नारायण देवस्थानात काल रविवार दिनांक 8 रोजी पहाटे काही अज्ञातांनी देवस्थानची फंड पेटी फोडली फंड पेटीत जमा झालेले पैसे लंपास करून जवळच फेकून दिली. या प्रकारची माहिती देवस्थानचे पुजारी जेव्हा देवस्थानची पूजा करायला पहाटे आले असता त्यांच्या नजरेस हा घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी हा प्रकार देवस्थान समितीच्या लक्षात आणून दिला. देवस्थान समितीने त्वरित घडलेल्या घटनेची माहिती डिचोली पोलिसांना दिली. माहिती मिळताच डिचोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले व चोरी झालेल्या घटनेचा पंचनामा केला. घटनेची माहिती स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्या? यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा प्रकार लक्षात घेवून याठिकाणी सिसी टिव्ही केमेरा बसविण्याचे त्यांनी देवस्थान समितीला आश्वासन दिले.
वर्षात या देवस्थानात दुसरी चोरी
यापूर्वीही या देवस्थानात असाच प्रकारची चोरी होवून अज्ञातांनी देवस्थानची फंड पेटी फोडून आतील पैसे लंपास करून फंड पेटी अशीच फेकून दिली होती. या वर्षात या देवस्थानात दुसऱ्या चोरीचा प्रकार घडला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहे.









