पावसाने दडी मारल्याने राज्यभरात शेतकरी वर्ग अस्वस्थ असला तरी कोकणात तुलनेने पावसाचे प्रमाण सामान्य आहे. तशी आकडेवारी हवामानशास्त्र विभागाने नुकतीच जाहीर केली आहे. जून महिन्यात पेरणीची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण होतात. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड होत असते आणि भातशेती जोमदार वाढू लागते. सध्या भातशेती चांगल्यापैकी पोसवत असून नियमित पावसाची अजून गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कोकणातील नाचणा शेतीलासुध्दा पावसाची गरज आहे. अद्याप नाचणा, वरीची शेते कणीस किंवा तुऱ्यावर आलेली नाहीत. त्यामुळे या काळात नियमितपणे पाऊस पडावा अशी इच्छा शेतकरी वर्ग धऊन आहे. हवामान शास्त्र विभागसुध्दा सप्टेंबर महिन्यात कोकणात बऱ्यापैकी पाऊस होईल असे म्हणत आहे.
यंदाच्या पावसाळी हंगामात 1 जून 2023 ते 30 ऑगस्ट 2023 या काळात कोकण विभागात पावसाचे प्रमाण सामान्य स्वऊपाचे राहिले आहे. रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पर्जन्यमान समान्य राहिले तर पालघर, ठाणे मुंबई उपनगर या भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. यंदा जून महिन्याच्या शेवटी कोकणात पावसाचे आगमन दमदारपणे झाले. यानंतरच्या जुलै महिन्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे मोठ्या प्ऱमाणात जलसाठा धरणभागात जमा झाला. शिवाय रत्नागिरी जिह्यात देखील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचे हे प्रमाण सातत्याने राहण्याची शक्यता असतानाच ऐन ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने ओढ दिली. कोकणातील धरणांतील पाणीसाठा राज्याच्या अन्य धरणांतील पाणीसाठ्यापेक्षा समाधानकारक आहे.
रत्नागिरी जिह्यात एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र 81 हजार 995 हेक्टर आहे. यापैकी भातपिकाखाली 70 हजार 572 हेक्टर एवढे क्षेत्र आहे. नागलीचे क्षेत्र 10 हजार 236 हेक्टर एवढे आहे. 2023 मध्ये 65 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात तर अन्य पिकासाठी 14 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. नाचणी पिकाची लागवड 9 हजार हेक्टरवर झाली.
2022 मध्ये खरीप हंगामासाठी 82 हजार 754 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली. जिह्यात लागवडीयोग्य क्षेत्र 3 लाख 98 हजार 404 हेक्टर एवढे आहे. त्यातील 91 हजार 992 क्षेत्र खरीप पिक लागवडीखाली आणण्यात आले आहे. सामान्यपणे लागवडीपैकी 80 टक्के क्षेत्रावर भातपिकाची तर 15 टक्के क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात येते. या आकडेवारीवऊन असे लक्षात येते की, गतवर्षी एवढी भातलागवड रत्नागिरी जिह्यात होऊ शकली नाही. गतवर्षीच्या तुलनेत केवळ 70 टक्के क्षेत्रावर यावर्षी खरीप भातलागवड होऊ शकली आहे.
सिंधुदुर्ग जिह्यात 2022 मध्ये 60 हजार 165 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची भातलागवड करण्यात आली. नागलीची लागवड 1 हजार 538 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. वरीची लागवड 39 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. खरीप हंगामात यावर्षी म्हणजे 2023 ला 59 हजार 583 हेक्टर क्षेत्रावर भातलागवड होऊ शकली. नाचणा लागवड 1620 हेक्टर क्षेत्रावर झाली. वरी लागवड 25 हेक्टर क्षेत्रावर झाली. सिंधुदुर्ग जिह्यात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सारखीच भातलागवड झाली आहे आणि नाचणी लागवड क्षेत्रात जवळपास 88 हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे.
सिंधुदुर्गात भात, नाचणी, वरी लागवडीचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत समाधानकारक आहे. तर रत्नागिरी जिह्यात लागवड क्षेत्रात मोठी घट दिसली आहे. याला पावसाचे महत्त्वाचे कारण आहे. पण अन्यही सामाजिक कारणे असल्याचे मानले जात आहे. शेतीला पर्यायी असलेल्या अन्य क्षेत्राकडे तऊण पिढी अधिक प्रमाणात वळत आहे. नोकरी, उद्योगाचे अनेक पर्याय युवकांकडे येत असल्यामुळे युवक वर्ग पारंपरिक शेतीतून बाजूला होत आहे. फलोत्पादनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन दरवर्षी अधिक क्षेत्र फळपिकाखाली येत आहे. यासाठी वापरली जाणारी जमीन भात नागली वरीच्या क्षेत्रापैकी आहे.
आगामी हंगामात भाताचे क्षेत्र घटलेले असेल आणि बाजारात येणारे भात उत्पादन कमी प्रमाणात असेल हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने यंदा तांदूळ निर्यातीवर बंदी घातली आहे. रत्नागिरी जिह्यात मोठ्या प्रमाणात भात लागवडीचे क्षेत्र घटल्याची आकडेवारी कृषी विभागाने दिली आहे. कमी अधिक प्रमाणात विविध ठिकाणी असेच चित्र दिसल्याने तांदूळ टंचाईची भीती व्यक्त होत आहे.
भातशेती हा आतभट्टयाचा व्यवहार आहे असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. भातशेतीसाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन यामध्ये मोठी तफावत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. परंपरेने चाललेला शेती उद्योग पुढे सुऊ ठेवावा. घरी उत्पादीत झालेले तांदूळ वापरणे हे लोकांना समाधानाचे वाटत असल्याने अद्याप अनेकजण परंपरेने आलेली शेती पुढे सुऊ ठेवत आहेत. मात्र उत्तम उत्पन्न देणारा पर्याय म्हणून भातशेतीकडे पाहिले जात नाही हे वास्तव आहे.
कोकण पट्टयात निर्माण होणाऱ्या भाताचा वापर शेतकरी वर्ग प्रामुख्याने स्वत:साठी करतो. उर्वरित भात सरकारी खरेदी केंद्रांवर घालण्यात येतो. ठाणे, रायगड किंवा विदर्भाच्या तुलनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात शेतकऱ्याकडून भात खरेदी अल्प प्रमाणात होत आहे. भाताच्या उत्पादनातील खर्च कमी व्हावा आणि त्याला किंमत चांगली मिळावी यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे. उत्तम दर्जाचे वाण पुढे आले आणि त्याला निर्यातीची संधी मिळाली तर शेतकऱ्यांच्या हाती बऱ्यापैकी उत्पन्न शिल्लक राहिल. मात्र त्यासाठी संशोधनाची दिशा आणि शेतकऱ्यांची मागणी हे साधले जाणे आवश्यक आहे. पाटबंधारे विभागाने मोठ्या प्रमाणात धरणांची उभारणी कऊन जलसंचय केला आहे. त्याचा अपेक्षित वापर शेतकऱ्यांकडून होत नसल्याची तक्रार केली जात आहे. शेतकऱ्यांनी धरणातील पाणी साठ्याचा उपयोग शेतीसाठी करावा म्हणून पाटबंधारे विभाग आग्रह करत आहे. तथापि शेतीतून पुरेसा परतावा येण्याची हमी नसल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. हा प्रतिसाद वाढवण्यासाठी केवळ भातशेतीच नव्हे तर अन्य पिकांचे पर्याय उभे राहिले पाहिजेत.
सुकांत चक्रदेव








