न्हावेली / वार्ताहर
Bhaskar Vaidya inaugurated the theater festival in Nhaveli!
न्हावेली येथील उत्कर्ष सेवा मंडळ , न्हावेली कट्टा कॅार्नर व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या तीन दिवस चालणाऱ्या नाट्यमहोत्सवाला उंदड प्रतिसाद मिळाला. या नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन दशावतार कलाकार भास्कर वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे , स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर , दशावतार कलाकार भास्कर वैद्य ,उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जनार्दन धाऊसकर, विश्राम नाईक, माजी सरपंच हरि वारंग, माजी उपसरपंच चंद्रकांत गावडे,कझ्यमर्सचे व्हाईस चेअरमन रेडकर , माजी सरपंच शरद धाऊसकर, चंद्रकांत पार्सेकर, अर्जुन नाईक , चंद्रकांत नाईक, सोसायटीचे व्हाईस चेअरमन आनंद नाईक , लक्ष्मण धाऊसकर , आनंद आरोंदेकर, सागर धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा पार्सेकर तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पार्सेकर तसेच मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .









