माजगाव शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
ओटवणे | प्रतिनिधी
भास्कर कासार यांनी आपल्या कासार समाजासह माजगावच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नाट्य, कला व क्रिडा उपक्रमात गेली तीन दशके दीपस्तंभाप्रमाणे केलेले कार्य संस्मरणीय असून चिरकाल टिकणारे आहे. अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निवृत्त वरिष्ठ लिपिक भास्कर धर्माजी कासार यांना श्रद्धांजली वाहिली. माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शोकसभेला माजी माजी सभापती अशोक दळवी, सावंतवाडी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड बालाजी रणशुर, माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे सचिव सीए लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष नारायण कानसे, सदस्य अनंत माधव, माजी मुख्याध्यापक आर के सावंत, एच बी सावंत, एम आर टोपले, माजी उपसरपंच संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तगुरु भोगणे, बाळा सावंत, मनोहर मोर्ये, माजी उपसरपंच मंगेश राठवड, राजू कासार, श्रेया कासार, दीपश्री सरमळकर, सद्गुरू कृपा मित्रपरिवारचे संजय सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे, सिद्धेश कानसे, प्राजक्ता गावडे, चंद्रशेखर सावंत, रावजी सावंत, रोहिदास केंगले, विविधा देसाई, शितल माजगावकर, मृणाली जाधव गणेश केरकर, महादेव जांभळे, प्रभाकर कानसे आदी उपस्थित होते.यावेळी अशोक दळवी यांनी भास्कर कासार यांनी आपल्या समाजासह सरकारी अधिकारी व कर्मचारी संघटनेत राज्यस्तरावर काम केले असुन त्यांच्या निधनाने समाजासह शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. अँड बालाजी रणशूर यांनी भास्कर कासार यांचे विविध क्षेत्रातील योगदान व मार्गदर्शन चिरंतर राहणार असून एका निस्वार्थी मार्गदर्शकाला सर्वजण मुकले असल्याचे सांगितले. माजगाव हायस्कूलसाठी तन मन धन अर्पण केलेल्या भास्कर कासार सर्वांसाठी मार्गदर्शक होते. हायस्कूलच्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचे स्वप्न होते. त्यांच्यासह माजगाववासियांचे हे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार असल्याचे लक्ष्मण नाईक आणि नारायण कानसे यांनी सांगितले. संजय सावंत यांनी भास्कर कासार यांच्या निधनाने सद्गुरु कृपा मित्रपरिवारचा आधारस्तंभ हरपल्याचे सांगितले. यावेळी मंगेश राठवड, राजू कासार, श्रेया कासार यांनी कासार ज्ञाती समाज बांधवांना संघटित करण्यासह त्यांच्या उत्कर्षासाठी भास्कर कासार यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणार असल्याचे सांगितले. आर के सावंत, एच बी सावंत, एम आर टोपले यांनी माजगाव हायस्कूलच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भास्कर कासार यांनी दिलेले योगदान विसरू शकत नसल्याचे सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भास्कर कासार नेहमीच मार्गदर्शन करीत तसेच त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच प्रशालेने उज्वल यशाची गौरवशाली परंपरा कायम राखल्याचे भाऊसाहेब चौरे यांनी सांगितले. यावेळी संजय कानसे, सिद्धेश कानसे यांनीही भास्कर कासार यांच्या आठवणींना उजाळा देताना भास्कर कासार यांच्या निधनाने माजगाववासियांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.









