ओटवणे | प्रतिनिधी
माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निवृत्त वरिष्ठ लिपिक भास्कर धर्माजी कासार यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता माजगाव हायस्कूल येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.माजगावच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नाट्य, कला व क्रिडा उपक्रमात गेली तीन दशके महत्वपूर्ण योगदान दिलेल्या भास्कर कासार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कासार ज्ञाती समाज, माजगाव कासारवाडा ग्रामस्थ संस्था, सद्गुरु कृपा मित्रपरिवार, राज्य कर्मचारी संघटना, राज्य निवृत्त सरकारी कर्मचारी संघटनांमध्ये अनेक वर्षे भरीव कार्य केले. त्यांच्या निधनाने समाजासह शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माजगाव शिक्षण सहाय्यक संस्था आणि भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.









