मुंबई :
दूरसंचार क्षेत्रातील दुसऱ्या नंबरची मोठी कंपनी भारती एअरटेलचा समभाग नव्या उच्चांकावर कार्यरत झाला आहे. शेअरबाजारात सोमवारी सदरचा समभाग 3 टक्के इतका वाढत इंट्राडेदरम्यान 2093 या उच्चांकावर पोहचला होता. चांगल्या नफ्याच्या शक्यतेमुळे समभाग दौडला असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या सलग सत्रात समभाग वाढला असून ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत पाहता समभाग 11 टक्के इतका वाढला आहे. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल 3 नोव्हेंबरला जाहीर होणार असून त्यादिवशी संचालक मंडळाची बैठक होणार आहे.









