3000 कि.मी. रेल्वे ट्रकला मिळणार ‘कवच’ ः दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा ट्रक सुरक्षित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा ट्रकला रेल्वे मंत्रालय सुरक्षा यंत्रणा ‘कवच’ने सुसज्ज करणार आहे. सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे नेटवर्कसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे दोन रेल्वेगाडय़ा टक्कर होण्यापासून वाचणार असल्याची माहिती बुधवारी रेल्वे अधिकाऱयांनी दिली. ही योजना ‘मिशन रफ्तार’ अंतर्गत स्थापित केली जाणार आहे. 3,000 कि.मी.पेक्षा जास्त ट्रक आणि 760 लोकोमोटिव्हमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी रेल्वेने निविदा मागवल्या आहेत.
रेल्वे टक्करविरोधी प्रणाली म्हणजेच ‘कवच’ यंत्रणेची जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित टेन टक्कर संरक्षण प्रणाली म्हणून रेल्वेकडून जाहिरात केली जात आहे. ही डिजिटल प्रणाली कोणताही सिग्नल तोडण्यासारख्या मानवी त्रुटींपासून संरक्षण देणार आहे. साहजिकच दोन ट्रेन एकमेकांसमोर आल्यास त्या स्वतःहून थांबू शकतील. आता दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मुख्य मार्गावर ‘कवच’ ही रेल्वे सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. याचा उद्देश टेन ऑपरेशन्सना पूर्ण सुरक्षा प्रदान करणे हा आहे. त्यामुळे एकाच ट्रकवर येणाऱया दोन गाडय़ांची टक्कर टळणार आहे. असे केल्याने आता प्रवासी अधिक सुरक्षित राहू शकतील.
अंदाजे प्रतिकिलोमीटर
20 लाख रुपये खर्च
या प्रणालीअंतर्गत ट्रान्समीटर लोकोमध्ये ट्रकच्या बाजूने रिसीव्हर्स बसवले जातील. या रिसीव्हर्समुळे चालक टेनचे ब्रेक नियंत्रित करण्यासाठी अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरू शकतील. अशा पद्धतीच्या रुळांसाठीचा अंदाजित खर्च प्रतिकिलोमीटर 20 लाख रुपये आहे. तर इंजिनच्या आत असलेल्या ट्रान्समीटरसाठी प्रतिइंजिन 60 लाख रुपये खर्च येईल.
मार्च महिन्यात यशस्वी चाचणी
भारतीय रेल्वेने मार्च महिन्याच्या प्रारंभी दोन रेल्वेंमध्ये समोरासमोर होणारी धडक टाळण्यासाठी ‘कवच’ सुरक्षा यंत्रणेची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली होती. स्वदेशी टेन टक्कर सुरक्षा प्रणाली कवचची सिकंदराबादमध्ये चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान दोन गाडय़ा विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे धावल्या. शून्य अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वदेशी बनावटीचे हे ऑटोमेटेड टेन प्रोटेक्शन (एटीपी) तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखादी टेन आपोआप थांबवण्यासाठी मदत होईल. तेलंगणातील सनथनगर-शंकरपल्ली सेक्शनवर सिकंदराबाद येथे रेल्वेगाडय़ांमधील ‘कवच’ची चाचणी घेण्यात आली होती.
‘कवच’द्वारे अशी टळेल दुर्घटना
जेव्हा टेनला सिग्नल दिला जातो, तेव्हा त्या टेनला पुढे जाण्याची परवानगी नसते. तेव्हा या तंत्रज्ञानाद्वारे धोक्मयाचा सिग्नल पाठविला जातो. यावेळी लोको पायलट टेन थांबवण्यात अयशस्वी ठरला, तर ‘कवच’ तंत्रज्ञानाद्वारे टेनचे ब्रेक आपोआप लागू शकतात आणि टेनला कोणत्याही मोठय़ा अपघातापासून वाचवता येते. हे तंत्रज्ञान हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. यासोबतच ते ‘सिस्टम इंटिग्रिटी लेव्हल-4’शी सुसंगत असून ते सुरक्षा प्रमाणपत्राचे सर्वोच्च मानले जाते.
अर्थसंकल्पात घोषणा
2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या तंत्रज्ञानाबाबत घोषणा करण्यात आली होती. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत दोन हजार किलोमीटर रेल्वेचे जाळे ‘कवच’ तंत्रज्ञानाखाली आणले जाणार आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये 1,098 किलोमीटरहून अधिक मार्गावर आणि 65 लोकोमोटिव्हवर ‘कवच’ बसवण्यात आले आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडॉरवर ‘कवच’ तंत्रज्ञान कार्यान्वित करण्याची योजना असून हा मार्ग सुमारे 3,000 कि.मी.चा आहे.
10 हजार वर्षांत
एकदाच खराब होईल
रेल्वे अधिकाऱयांच्या मते, ‘कवच’ प्रणाली 10 हजार वर्षांत एकदाच खराब होण्याची शक्मयता आहे. आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुरक्षा आणि क्षमता वाढीसाठी 2,000 कि.मी. नेटवर्क कव्हर केले जाईल. सध्या दक्षिण-मध्य रेल्वेवर 1,098 कि.मी. मार्गावर कवच बसविण्यात आले आहे. दरवषी सुमारे 4000 ते 5000 कि.मी. रेल्वेमार्गावर कवच बसवण्याचे लक्ष्य आहे. सध्या भारतीय रेल्वेकडून रेल्वे ऑपरेशन्स सुरक्षित करण्यासाठी आणि शून्य अपघात मिशनअंतर्गत मोठय़ा प्रमाणावर काम केले जात आहे.









