प्रतिनिधी/ बेळगाव
श्रीलंकेतील कोलंबो येथे 40 व्या इंटरनॅशनल कल्चरल फेस्टनिमित्त बेळगावच्या कलाकारांनी भारतीय परंपरा जपत भरतनाट्याम नृत्यकलेचे सादरीकरण केले.
वैष्णवी नृत्यालयाच्या माधुरी बोंद्रे व त्यांच्या विद्यार्थिनी महिमा रेवणकर, मयुरी जोशी, कु. रक्षा हणबरट्टी यांनी नृत्य सादर केले. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि टाळ्यांच्या गजरात स्वत: श्रीलंकेचे कल्चरल अफेयर मिनीस्टर विदुरा विक्रमान्यका यांनी मंचावर येऊन स्तुती केली व कलाकारांना प्रोत्साहन देत प्रशस्तीपत्र दिले.









