महाराष्ट्रासह तीन महत्वाच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP) खासदारांची (MP) संख्या मोठ्या प्रमाणात घटणार, असल्याचे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भाजप पक्षश्रेष्ठीसमोर दिलेल्या अहवालात दिसून आले आहे. हा अहवाल भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या त्रिसदसीय समितीने मांडला आहे. या अहवालानंतरच भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस 2.0 राबवण्यासाठी हलचाली केल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रससह, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार भाजपच्या रडारवर असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न हा याचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी तसेच देशातील राजकीय परिस्थितीचा अभ्य़ास हा मुख्य उद्देश असलेल्या या त्रिसदस्यीय समितीचे विनोद तावडे अध्यक्ष होते. देशभरातील भाजपची राजकीय ताकद आजमावून पाहणे आणि त्यादृष्टीने लोकसभेसाठी तयारी करणे यासाठी सुद्धा अभ्यास केला गेला.
२०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. पण त्यात आता घट होणार असल्याचे तावडे समितीने म्हटलेले आहे. नविन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीचे जास्तीत जास्त २२ ते २५ खासदारच निवडून येण्याचा कयास तावडे समितीने बांधला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या या अहवालामुळे भाजपने महाराष्ट्रावर लरक्ष केंद्रित करून ऑपरेशन 2.0 राबवण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विरोधी पक्षातील अनेत आमदार भाजपच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.
या अहवालानुसार आगामी महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या जागांमध्ये खूपच घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या महत्वाच्या भाजपचे लोकसभेचे संख्याबळ घटणार असल्याचे दिसून आले आहे. 2019 मध्ये भाजपचे 42 खासदार होते तर 2024 मध्ये हा आकडा 22 ते 25 इतका घटण्याची शक्यता आहे. या दोन राज्यांबरोबर बिहारमध्येही भाजपला निराश व्हावे लागणार असल्याचे अहवालात दिसून आले आहे.