भारतीय जनता पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपला ‘पराजय स्वीकारला आहे’ असे सांगून या निवडणुकीत कर्नाटकातील कोट्यवधी नागरिकांनी मतदानाच्या दिवशी उत्स्फुर्तपणे घराबाहेर पडून मतदान केल्याबद्दल कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. उद्याच्या निकालानंतर कर्नाटकात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस बहुमताचा दावा करेल असा विश्वासही सुरजेवाला यांनी केला.
माध्यमांशी बोलताना त्यांनी “कर्नाटकातील 6.5 कोटी जनतेने काँग्रेसला मतदान केल्याबद्दल आभार मानतो. उद्या निकाल येईपर्यंत वाट पाहूया…भाजपने आपला पराभव अगोदरच मान्य केला आहे. कर्नाटकचे ध्रुवीकरण करण्याचे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.”असे ते म्हणाले
माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पक्षाच्या काही ‘अटी’ मान्य करणार्या कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. निकालानंतर जनता दल (धर्मनिरपेक्ष) सोबत आघाडीच्या शक्यतेबद्दल पत्रकारांनी विचारले असता. “त्यांना जिथे जायचे आहे तिथे जाऊ द्या. मला विश्वास आहे की काँग्रेस चांगल्या बहुमताने सरकार स्थापन करेल.”