व्यवस्थापन, सप्लाय चेन, वर्क कॉस्ट, वर्कशॉप यांची घेतली माहिती
बेळगाव : भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्सच्या एम.कॉम. प्रथम व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हुबळी येथील व्हीआरएल लॉजिस्टिकला भेट दिली. या भेटीवेळी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन, सप्लाय चेन, वर्क कॉस्ट, वर्कशॉप यांची माहिती घेतली. याशिवाय वृत्तपत्राचे मुद्रण कसे होते, याचीही माहिती घेतली. यावेळी व्हीआरएल लॉजिस्टिकचे उपाध्यक्ष एस. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्याही व्यवसायाचा आणि वित्त व्यवस्थेचा कणा हा लेखा विभाग असतो. तुम्ही शोधल्या तर असंख्य संधी तुमच्यासाठी खुल्या आहेत, असे ते म्हणाले. याप्रसंगी कॉलेजचे समन्वयक बाळेश एम. व भारती हलसगी उपस्थित होते.









