ओटवणे । प्रतिनिधी
बावळाट येथील भरत सिताराम परब (६५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते गवंडी व सुतार कारागीर म्हणून परिचित होते. येथील भानुदास परब यांचे ते वडील होत तर मुंबईस्थित प्रभाकर व पुरुषोत्तम परब यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.









