आज मदुराईतून सुटणार : मडगावात असेल मुक्काम
मडगाव : ‘भारत गौरव टुरिस्ट टेन’ ही विशेष रेल्वेगाडी आज गुरूवार दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता तामिळनाडुतील मदुराई येथील कुडाळनगर रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. ही रेल्वेगाडी 28 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत देशातील काही महत्वाच्या ठिकाणांना भेटी देणार आहे. त्यामध्ये गोव्याचाही समावेश आहे. दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ही रेल्वेगाडी पोहोचेल. मदुराई येथील कुडाळनगर रेल्वे स्थानक ते हैदराबाद, अजिंठा, वेरूळ, मुंबई आणि गोवा अशी राउंड ट्रिप ही भारत गौरव टुरिस्ट टेन करणार आहे. टेन क्रमांक 06905 आज गुऊवारी दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता कुडाळ नगर रेल्वे स्थानकातून सुटेल आणि नागरकोइल टाऊन, तिऊवनंतपुरम, एर्नाकुलम टाऊन, पलक्कड, सेलम, पेरांबूर, मौला अली मार्गे प्रवास करेल. ही टेन रविवारी सिकंदराबादला पोहोचेल आणि सोमवारी औरंगाबादला पोहचेल. 4 ऑक्टोबरला लोकमान्य टिळक टर्मिनसला ही टेन पोहोचेल. त्यानंतर गोव्यात मडगाव येथे एक रात्र मुक्काम केल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9.15 वाजता कुडाळ नगरला परतणार आहे. पर्यटकांना चारमिनार, गोवळकोंडा किल्ला, सालारजंग संग्रहालय पाहण्यासाठी नेले जाईल. तसेच रामोजी फिल्म सिटीलाही पर्यटक भेट देणार आहेत. याशिवाय वेरूळ आणि अजंठा येथील लेणी पर्यटक पाहू शकतात. मुंबईत पर्यटकांना जुहू बीच, हँगिंग गार्डन्स, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, वांद्रे ब्रिज येथे भेट देता येईल. तर गोव्यात इच्छुक पर्यटकांना मांडवी नदीच्या समुद्रपर्यटनासाठी नेले जाईल. याशिवाय कळंगुट समुद्रकिनारा आणि जुने गोवे येथील चर्चला भेट देतील. या रेलगाडीची तिकीट उपलब्धता आणि वेळापत्रकासह प्रवासाविषयी अधिक माहिती www.raग्त्tदल्rग्sस्.म्दस् वर मिळू शकते.









