बेंगळूर :
संरक्षण क्षेत्रातील नवरत्न श्रेणीतील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्सला नुकतीच नवी संरक्षणविषयक कामाची ऑर्डर प्राप्त झाली असल्याची माहिती आहे. संरक्षण व बिगर संरक्षण क्षेत्रातील जवळपास 3289 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट कंपनीला प्राप्त झाले आहे. हलक्या वजनाच्या रडारचा पुरवठा यासह इतर कामाचे कंत्राट कंपनीने घेतले आहे. यात हिंदुस्थान शिपयार्ड यांच्याकडून 1075 कोटी रुपयांच्या कंत्राटाचा समावेश आहे.









