मालवण । प्रतिनिधी
देवबाग ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या 2025 ते 26 आणि 2030 ते 31 या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणुकीत भानुदास विष्णू येरागी यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत हि निवडणूक होऊन भानुदास येरागी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. तर उपाध्यक्षपदी आनंद परमेश्वर कुमठेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . धोंडी दिगंबर मळेकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.









