गुहागर :
महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना भंडारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी दिली. नुकतीच भंडारी समाजाची गुहागर येथे सभा पार पडली. गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीने राजेश बेंडल यांच्या रुपाने स्थानिक उमेदवार दिला आहे. यामुळे या उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय महायुतीमधील भंडारी समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी आपल्या हक्काचा, गुहागरचा चेहरा असलेले राजेश बेंडल यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी नीलेश मोरे, तसेच तालुक्यातील दीपक शिरघनकर, श्रीघर बानकर, तुषार सुर्वे आदींनी हात उंचावून पाठिंबा जाहीर केला असल्याचे कनगुटकर यांनी सांगितले.








