प्रतिनिधी, सेनापती कापशी
सद्गुरु बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र असलेल्या कागल तालुक्यातील मेतगे (महाराष्ट्र) येथे सद्गुरु बाळूमामा व हालसिद्धनाथाचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविक या भंडारा उत्सवामध्ये सहभागी झाले होते. धनगरी ढोलांचा गजर आणि बाळूमामांच्या नामाचा जयघोष करीत हा उत्सव साजरा झाला.
१९३२ मध्ये स्वतः बाळूमामांनी हालसिद्ध नाथाचा भंडारा म्हणून या सोहळ्याला सुरुवात केली होती. सुमारे ४० गावातील लोकांना कोणत्याही दळणवळणाची साधने नसताना स्वतः फिरून निमंत्रण दिले होते. दिवसेंदिवस या उत्सवाची ख्याती वाढत गेली. आज चार राज्यातील भाविक या भंडारा उत्सवाला हजेरी लावतात. या उत्सवाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह होतो. भागातील आणि दूरवरचे कीर्तनकार, प्रवचनकार तसेच भागातील भजनी मंडळी आपली सेवा करतात. प्रत्येक अमावस्येलाही येथे मोठी गर्दी होते.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सीमा भागातील ४० गावातील वालंग आणि भाकणूक करणारे भगवान डोणे महाराज (वाघापूर) यांचे गावांमध्ये आगमन झाले. गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भंडाऱ्याची प्रचंड उधळण करण्यात आली. भंडाऱ्याच्या रात्री रात्रभर जागर झाला. यावेळी धनगरी ढोलांच्या निनादांमध्ये धनगरी ओव्यांचाही पहाटेपर्यंत कार्यक्रम सुरू होता. पहाटे चार वाजता भगवान डोणे महाराज (वाघापूर) यांची भाकणूक झाली. त्यानंतर शनिवारी सकाळी पारायणाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात झाली. उपस्थित असणाऱ्या हजारो भाविकांनी येथील महाप्रसादाचाही लाभ घेतला.
उत्सवाचे नेटके नियोजन ….
श्री सद्गुरु बाळूमामा चारीटेबल ट्रस्ट मेतगेचे अध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, राजेंद्र पाटील, दयानंद पाटील, बाबासाहेब पाटील, बळीराम मगर, मोहन पाटील तसेच गावातील सर्व तरुण मंडळे, ग्रामस्थ यांनी नेटके नियोजन केले होते.
प्रचंड गर्दी…
आज मेतगे हे गाव मुख्य रस्त्यापासून बाजूला असूनही भाविक मार्ग शोधत मेतगेत पोहचतात. मेतगे गावाकडे जाणारे सर्व रस्ते वाहनाने आणि भाविक भक्तानी भरून गेले होते. मेतगे नगरी भंडाऱ्याच्या उधळणीने न्हाऊन निघाली होती. भंडाऱ्याच्या आदल्या दिवशीच भाविकांनी मेतगे गावात हजेरी लावली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









