वृत्तसंस्था / स्टुटगार्ट
भारताचा नंबर वन डबल्स खेळाडू युकी भांब्री आणि त्याचा अमेरिकन साथीदार रॉबर्ट गॅलोवे यांनी बॉस ओपन प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. दोन्ही सेट टायब्रेकरने निश्चित झालेल्या सामन्यात इंडो-अमेरिकन जोडीला मेक्सिकोच्या सँटियागो गोंझालेझ आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रायसेक यांच्याकडून एक तास आणि 24 मिनिटांत 6-7 (5), 6-7 (5) असा पराभव पत्करावा लागला. अनुभवी रोहन बोपन्ना आणि एन. श्रीराम बालाजी त्यांच्या संबंधित भागीदारासह स्पर्धा करत आहेत. बालाजी आणि त्याचा मेक्सिकन पार्टनर मिगुएल रेयेस-वरेला हे दुसऱ्या मानांकित फ्रेंच जोडी सॅडिओ डौम्बिया आणि फॅबियन रेबोल यांच्याविरुद्ध लढत देत आहेत. 45 वर्षीय बोपन्नाने बेल्जियमच्या सँडर गिलसोबत भागीदारी केली आहे आणि त्यांची लढत स्थानिक जोडी जेकोब श्नायडर आणि मार्क वॉलनर यांच्याशी होईल.









