वृत्तसंस्था/ जिनेव्हा
युकी भांब्री व रॉबर्ट गॅलोवे या दुसऱ्या मानांकित जोडीला येथे सुरू झालेल्या जिनेव्हा ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. जर्मनीच्या जेकब श्नायटर व मार्क वॉलनर यांनी त्यांचा पराभव केला.
या भारत-अमेरिकन जोडीला जर्मनीच्या बिगरमानांकित जोडीने 7-6 (7-3), 6-4 असे हरविले. फ्रेंच ओपन स्पर्धेआधी ही शेवटची क्लेकोर्ट स्पर्धा आहे. भांब्री व गॅलोवे यांना 3240 युरो रक्कम मिळाली. मात्र त्यांना एकही मानांकन गुण मिळाला नाही. गेल्या आठवड्यात भांब्री-गॅलोवे यांना बोरडॉ चॅलेंजर स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले होते. क्लेकोर्टवरील त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी होती. त्याआधी अॅलेक्सी पॉपीरिनसमवेत खेळताना त्याला माँटे कार्लो, एटीपी 500 म्युनिच, माद्रिद मास्टर्स रोममधील स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.









