सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्तविद्यमाने स्पर्धेचे आयोजन
आचरा प्रतिनिधी
सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधननिमित्त आचरा पंचक्रोशी अंतर्गत भव्य “राखी बनविण्याची स्पर्धा”आयोजित केली होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक भक्ती कानविंदे, द्वितीय क्रमांक दिव्या गावकर, तृतीय क्रमांक श्रुती जाधव, विशेष लक्षवेधी राखीचे पारितोषिक स्वराली आचरेकर यांनी प्राप्त केले. विजेत्यांना चषक व रोख रक्कमेचे पारितोषिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेचे परीक्षण संदेश रावले यांनी केले.
या पारितोषिक वितरण प्रसंगी आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, माजी सरपंच प्रणया टेमकर, मंगेश टेमकर, डॉ सिद्धेश सकपाळ, मांगरीश सांबारी, विजय कदम, सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, अभिराज भाबल, अनिकेत पांगे, संतोष वायंगणकर, कानू सावंत, रुपम टेमकर अनुराधा आचरेकर व अन्य मान्यवर, स्पर्धक उपस्थित होते.









