बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि राजस्थान स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱया फेडरेशन चषक स्पर्धेत बेळगावची स्केटिंगपटू भक्ती हिंडलगेकरने चमक दाखविली.
जोधपूर राजस्थान येथे ही रोलर आणि इनलाइन हॉकी स्केटिंग स्पर्धेत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास 600 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. इनलाइन हॉकी स्केटिंग चॅम्पयिनशिपमध्ये भक्ती हिंडलगेकर हिने कांस्यपदक मिळविले. भक्ती हिंडलगेकर ही गेल्या 10 वर्षांपासून सराव करीत आहे. तिला बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन तसेच स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.









