प्रतिनिधी /मोरजी
पार्से येथील श्री भगवती देवस्थानात आषाढी एकादशीनिमित्त रविवारी दुपारी अखंड भजनी सप्ताहाला प्रारंभ झाला. सोमवारी दुपारी सप्ताहाची सांगता होणार आहे.
रविवारी दुपारी चावदेवाडा पारकरी भजनी मंडळाच्या भजन मैफलीने या दीड दिवशीय भजनी भजनी सप्ताहास सुरवात झाली. त्यानंतर चोन्साई पारकरी मंडळ, मेस्तवाडा पारकरी मंडळ, मधलावाडा पारकरी मंडळ आणि चरीवाडा पारकरी भजनी मंडळातर्फे रात्रभर भजनाच्या मैफली सादर करण्यात आल्या. यावेळी विविध पारकरी मंडळातर्फे आकर्षक चित्ररथही तयार करण्यात आले होते. विविध वाडय़ांवरून दिंडीद्वारे भजन सादर करत सजविलेले चित्ररथ श्री भगवती मंदिरात आले. रात्री ठीक ठिकाणी गायनाच्या मैफली रंगल्या त्यात गोमंतकातील गायक कलाकारांनी भाग घेतला. तर काही पारकारी मंडळातर्फे स्थानिक कलाकारांच्या गायन मैफली सादर केल्या. सोमवारी दुपारी गोपाळकाल्याने या अखंड भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे.









