प्रतिनिधी मालवण
नवरात्रोत्सवानिमित्त १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत रोज रात्री ८ वा. येथील श्री देवी भैरवी मंदिर, संतसेना मार्ग, सोमवार पेठ येथे भजन महोत्सव २०२३ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा नियोजित कार्यक्रम असा : १५ रोजी लिंग – रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पोखरण बुवा : समीर कदम, १६ रोजी घुमडाई भजन मंडळ – घुमडे – बुवा : नाना सामंत. १७ रोजी गिरोबा मंडळ, नांदरुख–बुवा : गणेश चव्हाण. १८ रोजी विश्वकर्मा मंडळ, सुतारवाडी वायरी- बुवा : अक्षय परुळेकर. १९ रोजी आकारी ब्राह्मणदेव मंडळ, कांदळगाव कातवड- बुवा : चेतन धुरी. २० रोजी ब्राह्मणदेव मंडळ कातवड, मालवण-बुवा : मंगेश नलावडे. २१ रोजी ब्राह्मणदेव मंडळ, आनंदव्हाळ – बुवा : पप्पू सामंत. २२ रोजी भद्रकाली मंडळ बुवा : सिद्धेश कांबळी, रेवंडी व अष्टपैलू कलानिकेतन, बुवा: सुनील परुळेकर. २३ रोजी ब्राह्मणदेव मंडळ न्हिवे, कोळंब- बुवा राजन दळवी, सिद्धेश पाताडे. 24 रोजी रवळनाथ मंडळ, आडवली भटवाडी – बुवा : विनायक भिडे. लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाने केले आहे.









