म्हैसाळ वार्ताहर
येथील म्हैसाळ योजनेसह परीसरातील शेतकरी व अनेक गावांना वरदायी ठरलेला म्हैसाळ बंधारा यावेळी ऐन उन्हाळ्यात प्रथमच तळ गाठला आहे.परीणामी म्हैसाळ पंपगृह सह अनेक जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत.यामुळे अवलंबित शेती धोक्यात आली आहे.पुरश्या पाण्या अभावी. पिके करपून जात आहेत.नदी पात्रात तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी ग्रामस्थां मधुन होत आहे.
दरम्यान धरण साठ्यात पाणी कमी होण्यास पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे असा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यातील पाणी साठा फारसा कमी झाला नव्हता.याठिकाणी अनेक खाजगी व सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व शेती पंप आहेत.म्हैसाळ योजनेचा मोठा प्रकल्प सुरू आहे.याची जाणीव संबंधित खात्याला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या बंधाऱ्यातील अनेक बर्गे नाहीत.यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कर्नाटकात वाहुन गेला.परिणामी अनेक गळती व ठिकठिकाणी बर्गे नसल्याने पाणी अडविले गेले नाही.गेल्या महिन्यात तुडुंब भरून वाहणारी नदी आज कोरडी पडली आहे.यामुळे ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना बंद ठेवण्यात येत आहे.शेती पंप बंद पडल्याने पिके.धोक्यात आली आहे.पूर्व भागात म्हैसाळ योजना ही अंशता बंद असल्यामुळे या भागातील शेती ही धोक्यात आली आहेत.या सर्व परीस्थिती ला पाटबंधारे विभागाच जबाबदार आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.दरम्यान पाटबंधारे विभागाने कोयना व वारणा धरणक्षेत्रात पाणी साठा कमी असल्याने आहे. पाणी टंचाई निर्माण झाली आहे.यासाठी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, बंधार्याच्या दुरवस्था बाबत दैनिक तरुण भारत ने वेळोवेळी आवाज उठविला होता.याची वेळीच दखल घेऊन उपाययोजना केल्या असत्या तर आज पाणी टंचाई निर्माण झाली नसती अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.








