ओटवणे प्रतिनिधी
देवसु पलीकडचीवाडी येथील रहिवासी भागिरथी तातो यादव (८५) यांचे शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महादेव यादव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई, पुतणे असा परिवार आहे.









