जत, प्रतिनिधी
माता-पित्याचे छत्र हरविलेल्या चिमुकलीला भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून माणुसकीचे छत्र लाभले.या प्रतिष्ठानच्या प्रेमळ पंखाखाली लहानाची मोठी झाली. संस्थेने तीचे १२ वी ते बीसीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यापुढील शिक्षण अनेकांच्या चंद्रसेन सावंत यांनी पालकत्व स्वीकारत एमसीए पर्यंत पूर्ण केले. सावंत यांच्या सहकार्याने पुणे येथे एका कंपनीत ती नोकरी करू लागली. नुकतेच लग्न ठरले आणि जिथं तिचे बालपण गेले त्या जत येथील भगिनी निवेदिता बालगृह आवारात विवाह सोहळाही पार पडला.जत शहरातील माणूसकीची भावकीही गोळा झाली आणि विवाह सोहळ्याला साहित्यरूपी मदतीतून एक सुंदर गोडवा तिच्या आयुष्यात नोंदला गेला. सर्वांच्या प्रेमाचे, संस्काराचे पंखात बळ भरून संसाररूपी प्रवासात तीने प्रस्थान केले आहे. यावेळी आमदार विक्रमदादा सावंत व त्यांच्या पत्नी वर्षाताई सावंत या उभयतांनी कन्यादान केले.
सुजाता संगीता पाटील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मध्ये सन 2005 ला दाखल झाली त्यावेळी ती सात वर्षाची होती.कोणीच नातेवाईक न आल्याने बालकल्याण समितीच्या सूचनेनुसार तिला भगिनी निवेदिता संस्थेत संगोपनासाठी ठेवले.संस्थेच्या सचिव नसीम शेख यांच्यासह साऱ्यांनी लेकीप्रमाणे प्रेम दिले.सुरुवातीला काही दिवस संस्थेच्या पाळणाघरात ठेवले.नंतर जत येथील प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर येथील राजे रामराव विद्यालय जत येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले.त्यानंतर बीसीएचे शिक्षण तिने राजे रामराव महाविद्यालयात घेतले. तिची शिकण्याची जिद्द आणि चिकाटी पाहून 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढे दोन वर्षे तिला राहण्मुयासाठी मुदतवाढ मिळाली. पुढील शिक्षणासाठी चंद्रसेन सावंत व मिनलदीदी सावंत-पाटील यांनी पुढाकार घेत सांगलीतील भारती विद्यापीठात संगणकीय एमसीए पदवी सुजाताने घेतली.यावेळी नीता दामले यांनी सांगलीत श्रमिक महिला वस्तीगृहात निवासाची व्यवस्था केली.सावंत कुटुंबीयांच्या मदतीतून तिने काही दिवस पुण्यात नोकरी केली.
आता वेळ विवाहाची होती.बायोडाटा तयार झाला.तो वाघवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील मारुती पोवार यांचे चिरंजीव अमोल यांना एका संकेतस्थळावर पाहिला.बायोडाटा व इतर माहितीवर घेतल्यावर सुजाताच्या आयुष्याच्या प्रवासावर ते थक्क झाले.आई-वडिलांनी त्यांच्या निर्णयाला साथ दिली. संस्थेच्या सचिव नसीम शेख,चंद्रसेन सावंत,रेखाताई मुळे,नारायण घोरपडे यांनी अमोल यांचे घरी प्रत्यक्ष भेट दिली.आणि मुहूर्तावर साखरपुडा उरकला.त्यानंतर जत येथे दि. १४ रोजी विवाह संपन्न झाला.यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले वऱ्हाडी सारेच गहिवरले.आमदार सावंत यांनी कन्यादान केलं तर मामाची भूमिका राजू माने यांनी बजावली.अन उपस्थितांचे डोळे पाणावले.अनाथांचे संगोपन करण्याची शपथ घेत आणि वृक्षारोपण करत लग्न सोहळा संपन्न झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील अमोल हा एक प्रख्यात कंपनीत नोकरी करतो.जतचे आमदार विक्रमसिंह सावंत,श्रीपाद जोशी,प्रभाकर जाधव,पोलीस निरीक्षक राजेंद्र रामाघरे,सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते,पत्रकार किरण जाधव,बादल सर्जे,अमोल कुलकर्णी,हरी शेटे,गोपाल पाथरुट,शशिकांत हेगडे,निलेश माने,प्रणय वाघमारे,मीनाक्षी अक्की यांच्यासह बालकल्याण समितीचे सदस्य कालिदास पाटील निवेदिता ढाकणे,शिवकुमारी ढवळे संस्थेचे अध्यक्ष नसीम शेख सचिव निता दामले नसिम काझी,मोहिनी जाधव,आदी उपस्थित होते.
विवाहासाठी जत येथून झाली मदत
नारायण घोरपडे,सुनीता दिलीप शिंदे,प्रमोद पोतदार,रोहित कोडग,फोटोग्राफर भारत कोडग,जयश्री जाधव,प्रा.मधुकर शिंदे ,मंडळाधिकारी संदीप मोरे,डॉ.सौ सरिता पट्टणशेट्टी, डॉ.सौ विना तंगडी,मेघा शिंदे, आश्विनी चव्हाण,अनुराधा संकपाळ, विजया बिज्जरगी, नाक्षी काटकर, बबन गरड,भारत गायकवाड,विक्रम ढोणे,नाना कोडग.
विवाहासाठी सांगलीतून झाली मदत
शशिकिरण शेट्टी, स्वातीमित्रा कांबळे, समिना चिकुर्डेकर,नंदकिशोर मालाणी, नीता कांबळे, पत्रकार दीपक चव्हाण व सोनाली केंकडे,प्राची नवरगावकर,यशवंत नगर येथील बालगृह सर्व स्टाफ,विश्रामबाग येथील जाइंट्स ग्रुपच्या वैशाली कुलकर्णी,डॉ.कीर्ती जाधव.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








