स्वर्णवल्ली श्रीगेंदा मठाचा उपक्रम
खानापूर : तालुक्यात भगवद्गीता अभियान राबवण्यासंदर्भात शिर्शी येथील स्वर्णवल्ली मठाचे गंगाधरेंद्र सरस्वती यांच्या उपस्थितीत येथील जोशी वाड्यात बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना भगवद्गीता अभियान राबवण्यासाठी स्वयंसेवक तयार करण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. या स्वयंसेवकांनी भगवद्गीता सर्वसामान्यपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, भगवद्गीतेत संपूर्ण मानव जीवनाचे सार असून जीवनाच्या विविध पातळीवर जीवन जगत असताना भगवद्गीतेत संपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात मानवावर तणाव आहे. हा तणाव दूर करून आनंदी जीवन जगण्यासाठी भगवद्गीता समजणे गरजेचे आहे. जीवनातील समस्या सोडवायच्या असतील तर भगवद्गीतेचे पठण करणे गरजेचे आहे. पाश्चात संस्कृतीचा वाढलेला पगडा त्यामुळे बदलेले जीवनमान यामुळे सनातन संस्कृतीवर झालेले विकृत परिणाम थोपवण्यासाठी भगवद्गीता प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. म्हणूनच सुवर्णवल्ली श्रीगोंदा मठाच्या माध्यमातून भगवद्गीता अभियान सुरू करण्यात येणार आहे. याची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून तालुक्याच्या सर्व भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सिताकांत जोशी, शार्दुल जोशी, अरुण नाईक, सुभाष देशपांडे, सदानंद कपिलेश्वरी यासह इतर उपस्थित होते.









