पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागात जोडणारा भाचरवाडी खडेखोळ रस्ता खचल्याने वाहतूक साठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन पन्हाळा येथे संजिवनी मार्ग ये- जा होती पण रस्ता खचल्याने वाहतूक धोकादायक बनली होती.
यासंदर्भात पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी हा धोकादायक रस्ता बंद करून संभाव्य धोके टाळण्यासाठी निर्णय घेतला आहे. दरम्यान आळवे ते मानेवाडी रस्त्यावर झाड उमळुन पडले असुन वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली आहे. सकाळ पासून पावसाच्या सरी जोरदार कोसळत असुन कासारी नदीत वाढ होत आहे. पाऊस कोसळत