विनोद सावंत, कोल्हापूर
महापालिकेने रस्त्यावर बंद अवस्थेत असणारी धुळखात पडलेली बेवारस वाहने जप्त करण्याची धडक मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत 107 वाहनांना नोटीस बजावली असून 11 वाहने जप्त केली आहेत. ही जप्त केलेली वाहने 2100 रुपयांचा दंड भरल्यानंतर तसेच पुन्हा रस्त्यावर लावणार नाही या अटीवरच मालकाकडे परत दिली जात आहेत.
शहरामध्ये काही ठिकाणी अनेक दिवसांपासून वाहने बंद अवस्थेत (स्क्रॅप) एकाच ठिकाणी धुळखात पडून आहेत. ही वाहने रस्ते, पूल, उड्डाण पूल येथे अनाधिकृतपणे रस्त्यावर सोडून दिलेली आहेत. अशा बेवारस वाहनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. हा धोका ओळखून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभाग व शहर वाहतूक शाखा, मनपाचे संबंधित विभागीय कार्यालय यांच्यामार्फत बेवारस वाहने जप्त केली जात आहेत.
दोन वाहन चालकाकडून 4200 दंड वसुल
जप्त केलेली दंड भरूनच परत केली जात आहेत. यामध्ये 1200 रुपये मनपाचे तर 900 रुपये क्रेन भाडे असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत जमा करावे लागतात. दोन वाहनचालकांकडून अशा प्रकारे 4200 रुपयांचा दंड वसुल करून वाहने परत केली आहेत.
आजपासून मोठी कारवाई
अतिक्रमण निर्मुलन पथकाने शहरात धुळखात पडलेल्या एकूण 106 बेवारस वाहनांवर नोटीस चिटकवली होती. यापैकी 11 वाहने जप्त केली असून 40 वाहने स्वतःहून मालकांनी हटविली आहेत. उर्वरीत 56 वाहनांची नोटीसची मुदत संपणार असल्याने सोमवार (दि. 9) पासून वाहने जप्त करण्याची धडक मोहीम राबविली जाणार आहे.
केएमटीही पैसे वसुल करणार
जप्त केलेली वाहने महापालिका कर्मचारी शास्त्रीनगरातील केएमटीच्या वर्कशॉपमध्ये लावली जात आहेत. केएमटीही येथे वाहने लावल्यावरून संबंधित मालकाकडून दिवसा 60 रुपयेप्रमाणे रक्कम भरून घेणार आहे.
रस्त्यावर झाकून ठेवलेली वाहनेही जप्त
शहरातील रस्त्यावर बंद अवस्थेत (स्क्रॅप) असलेली वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने अशी वाहने हटविण्याची विशेष मोहीम सुरु आहे. सध्या धुळखात पडलेली वाहने जप्त केली जात आहे. पुढील टप्प्यात पार्कींगमध्ये वाहने न लावता रस्त्यावर झाकुन ठेवलेली वाहनेही जप्त केली जाणार आहेत. त्यामुळे पार्किंगमध्येच वाहने लावून जप्तीची कारवाई टाळावी.
सचिन जाधव, अतिक्रमण निर्मुलन प्रथक प्रमुख
नोटीस बजावलेली बेवारस वाहने – 107
जप्त केलेली वाहने – 11
स्वतःहून मालकांनी हटवलेली वाहने -40
दंड – 2100
दंड भरुन परत घेतलेली वाहने – 2
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









