Best Way to Use Ajwain Seeds: भारतात प्रत्येक घरात नियमित रोज थोडा तरी मसाला वापरला जातोच. याशिवाय जेवणाला चव येत नाही असं म्हटलं जातं. अगदीच काही नाही तर जिरे, धने तरी वापरतातच. भारतीय मसाल्यांचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय पचनक्रियेस मदत होते. मसाल्यातील अशाच एका घटकाविषयी आपण जाणून घेणार आहोत ज्याचा वापर केवळ जेवणाची लज्जत वाढवण्यासाठीच नाही तर पोटदुखी कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी देखील होतो. हा पदार्थ म्हणजे ओवा. यात प्रथिने,फायटोकेमिकल,फायबर,कॅल्शियम,फॉस्फरस,लोह आणि जंतुनाशक प्रतिजैविक यांसारखे पोषक घटक असतात. याच्या वापराने तुमचे वजन कमी होण्यास देखील मदत होते. त्याचा वापर कसा करावा चला जाणून घेऊया.
ओव्याचे पाणी
ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हे पाणी नियमित सेवन करा. यासाठी एक ग्साल पाण्यात 2 चमचे ओवा टाका. आता हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. पाण्याचा रंग बदलण्यास सुरुवात झाली की गॅस बंद करा यानंतर पाणी गाळून घ्या.
ओव्याचा चहा
शरीरात होणारा संसर्ग कमी करण्यासाठी ओव्याच्या चहाचा फायदा होतो. हा चहा तयार करताना एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा आणि पाव चमचा हळद पावडर घाला. आता हे पाणी चांगले उकळून घ्या. 2 ते 3 मिनिटे उकळत्या पाण्यात ओवा शिजू द्या. यानंतर पाणी गाळून गरम गरम पिऊ शकता.
हिंगाचा वापर करू शकता
साधारणता जेव्हा पोटदुखीचा त्रास होतो तेव्हा आपण ओवा चावून खातो त्यांनतर पाणी पितोय काही वेळात पोटदुखी कमी होते. तुम्हाला जर पोटदुखीसोबत मुरडा मारत असेल तर तुम्ही ओव्यासोबत हिंग वापरू शकता. यामुळे देखील खूप फरक पडतो.
असादेखील वापर करू शकता
आपण कोणताही पराठा करताना त्यामध्ये थोडा ओवा वापरतोच. मात्र तुम्ही समोसा,कचोरी,पुरी आणि पकोडा बनवताना देखील पिठात मिक्स करू शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









