प्रतिनिधी / पणजी
न्यू गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा चा प्रकल्पाला उत्कृष्ट शाश्वत ग्रीन फिल्ड विमानतळ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
असोचॅम या संस्थेच्या 14 व्या आंतरराष्ट्रीय परिषद तथा नागरी हवाई उड्डाण पुरस्कार 2023 च्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवीदिल्लीत लिला पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या एका समारंभात केंद्रिय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.









