► प्रतिनिधी/ बेळगाव
यंदाचा उत्कृष्ट महसूल अधिकारी पुरस्कार (2024) बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार निंगनगौडा चन्नबसनगौडा यांना प्रदान करण्यात आला. शुक्रवारी बेंगळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे प्रधान कार्यदर्शी व्ही. रश्मी यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.









