3 जवानांना शौर्य पुरस्कार : मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पुरस्कार वितरण
म्हापसा : राज्य सरकार व अग्निशमन दल संचालनालयातर्फे वार्षिक अग्निशमन दिनाचे औचित्य साधून यावेळी विविध स्तरावरील दलास बक्षिसवितरण समारंभ पार पडला. त्यात उत्तर गोवा विभागात उत्कृष्ट अग्निशमन दल राखल्याबद्दल उत्कृष्ट मेंटेनन्स फायर स्टेशन म्हणून म्हापसा अग्निशमन दलाची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते हा पुरस्कार म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान म्हापसा अग्निशमन दलातील जवान स्वप्नेश कलंगुटकर व अक्षय सावंत यांनी कारोणा हळदोणा येथे 700 फूट विहिरीत पडलेल्या 65 वर्षीय वयोवृद्धाला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिल्याप्रकरणी खास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अर्जुन धावस्कर यांनी वागातोर येथे 55 फूट विहिरीत पडलेल्या एका 33 वर्षीय पर्यटकाला जीवदान दिले होते. म्हापसा अग्निशमन दलाच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.









