वृत्तसंस्था/ पॅरिस
सेंट डेनिस, फ्रान्स येथे झालेल्या पुरुषांच्या 400 मी. हर्डल्समध्ये अमेरिकेच्या राय बेंजामिनने विश्वविक्रमधारक नॉर्वेचा कर्स्टन वारहोम व ब्राझीलचा अॅलिसन डॉस सँटोस यांना मागे टाकत सुवर्ण पटकावले.
बेंजामिनने 46.46 सेकंदात शर्यत पूर्ण करीत सुवर्ण घेतले. बराच मागे राहिलेल्या वारहोमने 47.06 सेकंद अवधी घेत रौप्य व डॉस सँटोसने 47.26 सें. अवधी घेत कांस्यपदक पटकावले आठव्या अडथळ्यावेळी बेंजामिन थोडा अडखळला होता. तरीही त्याने पहिले स्थान कायम राखत शर्यत जिंकली. तीन वर्षापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये वारहोमने सुवर्ण तर बेंजामिनला रौप्य मिळाले होते.









