वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2025 च्या प्रो कब•ाr लिग स्पर्धेतील येथे खेळवण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात बेंगळूर बुल्सने दबंग दिल्लीला 33-23 अशा 10 गुणांच्या फरकाने पराभवाचा धक्का दिला.
12 व्या प्रो कब•ाr लिग हंगामातील स्पर्धेत बेंगळूर बुल्स संघातील विदेशी कब•ाrपटू अलिरझा मिर्झान याने सर्वाधिक सुपर 10 गुण नोंदवण्याचा विक्रम केला आहे. या सामन्यात बेंगळूर संघातील बचावफळीत खेळणाऱ्या संजयने 4 ट्रॅकल गुण तर योगेश आणि दीपक यानी प्रत्येकी 3 ट्रॅकल गुण नोंदविले. या सामन्यातील विजयामुळे बेंगळूर बुल्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दबंग दिल्लीतर्फे मोहीत देस्वाल हा सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने या सामन्यात एकूण 11 गुण नोंदविले. खेळ सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 10 मिनिटांच्या कालावधीत दबंग दिल्लीने बेंगळूर बुल्सवर 3 गुणांची आघाडी घेतली होती. बेंगळूर बुल्सतर्फे अशिश मलिकने गुणाचे खाते उघडले. अलिरजा मिर्झाच्या शानदार चढाईमुळे बेंगळूर बुल्सने दबंग दिल्लीशी 6-6 अशी बरोबरी साधली. त्यानंतर आणखी पाच मिनिटांच्या कालावधीत बेंगळूर बुल्सने मध्यंतरापर्यंत दबंग दिल्लीवर 12-10 अशी दोन गुणांची बढत घेतली होती.
सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर अलिरजाच्या शानदार कामगिरीमुळे दबंग दिल्लीचे सर्व गडी बाद झाले. त्यामुळे शेवटचा 10 मिनिटांच्या कालावधी बाकी असताना बेंगळूर बुल्सने दबंग दिल्लीवर 8 गुणांची आघाडी मिळविली होती. शेवटच्या दोन मिनिटांमध्ये आपल्या सुपर चढाईवर मिर्झानने बेंगळूर बुल्सला 15 गुणांची आघाडी मिळवून दिली. पण शेवटच्या दोन मिनिटांमध्ये दबंग दिल्लीच्या आघाडी फळीतील खेळाडूने बेंगळूर बुल्सचे गडी झटपट बाद केल्याने बेंगळूर बुल्सने हा सामना अखेर 33-23 अशा 10 गुणांच्या फरकाने जिंकला.
…..









