वृत्तसंस्था/ हैद्राबाद
2024 च्या प्रो कबड्डीr लीग स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात बंगला वॉरियर्सने युपी योद्धासचा तर दुसऱ्या एका सामन्यात हरियाणा स्टिलर्सने जयपूर पिंक पँथर्सचा पराभव केला.
बंगला वॉरियर्स आणि युपी योद्धास यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. बंगाल वॉरियर्सतर्फे मनिंदर सिंग, सुशील कांबरेकर आणि नितीन धनकर यांची कामगिरी दर्जेदार झाली. युपी योद्धासतर्फे भरतने 13 गुण नोंदविले. बंगाल वॉरियर्सने युपी योद्धासचा 32-29 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात हरियाणा स्टिलर्सने जयपूर पिंक पँथर्सवर 37-25 अशा गुण फरकाने विजय मिळविला. धनकरच्या शानदार चढायामुळे शेवटच्या 10 मिनीटांच्या कालावधीत युपी योद्धासचे सर्व गडी बाद झाले. त्यामुळे बंगाल वॉरियर्सला हा सामना 3 गुणांनी जिंकला आला.









