वृत्तसंस्था/ पंचकुला
येथे सुरू असलेल्या युटीटीच्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेनिस टेबल चॅम्पियनशिप स्पर्धेत पश्चिम बंगालच्या महिला टेबलटेनिसपटूंनी हरियाणाचा 3-1 अशा फरकाने पराभव करत पुढील फेरी गाठली.
बंगाल आणि हरियाणा यांच्यातील या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 19 वर्षाची सुहानाने विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली पण तिला यश मिळू शकले नाही. परतीच्या एकेरी सामन्यात सुहाना सैनीला हरियाणाच्या प्रेपोथी सी. हिच्याकडून हार पत्करावी लागली. प्रेपोथीने हा सामना 10-12, 9-11, 11-4, 11-5, 11-4 असा जिंकला. पुरूषांच्या विभागात भारतीय एअरपोर्ट अॅथॉरिटी संघाने हरियाणाचा 3-0 असा फडशा पाडला. पुरूषांच्या सांघिक विभागात पीएसपीबी, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि तेलंगणा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.









